LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मोफत घरांच्या मागणीसाठी सिमाभागातील गिरणी कामगार मुंबईकडे रवाना*

Advertisement
बेळगाव :
मुंबईतील गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याची घोषणा राज्य सरकारने यापूर्वी केली असली तरी त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या मागण्यांसाठी श्रमिक संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सीमाभागातील अनेक गिरणी कामगार मुंबईकडे रवाना झाले आहेत.
आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी ७ मार्च रोजी बेळगावजवळील बोडकेनहट्टी येथे कामगारांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत मोठ्या संख्येने कामगारांनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

आज चलवेनहट्टी, हंदिगनूर, अगसगे, अतिवाड, कुरीहाळ, कट्टनभावी, म्हाळेनहट्टी, मण्णीकीरे, बेक्कीनकेरे, किटवाड, बंबरगा, केदनूर तसेच चंदगड तालुक्यातील कुर्णी, गुजवडे, कोवाड, सतेवाडी आणि अडकूर आदी गावांतील कामगार मुंबईकडे रवाना झाले.
यावेळी मनोहर हुंदरे, शिवाजी हुंदरे, दरशथ घाटगे, संजीव कुमार, अतुल दिघे, केदारी पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनात मोठ्या प्रमाणात कामगार सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*