डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफी 2026 अंतर्गत रविवारी रंगलेल्या सामन्यांत स्थानिक संघांनी दमदार खेळ सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली. दिवसातील पाचही सामने चुरशीचे झाले.
▶️ पहिला सामना
चॉईस 11 यमकनमरीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भगवा रक्षक डिंग डाँग संघाने 8 षटकांत 7 गडी गमावत 95 धावा उभारल्या.
रोहित पाटील (27) आणि आदित्य वारंग (23) यांनी आक्रमक खेळ केला.
गोलंदाजीत मुजाहिदने 3 बळी घेत प्रभाव टाकला, तर महांतेशने 2 विकेट मिळवल्या.
उत्तरात चॉईस 11 संघ अपयशी ठरला आणि डिंग डाँगने 28 धावांनी विजय मिळवला.
👉 सामनावीर: आदित्य वारंग
👉 पुरस्कार वितरण: एएसआय श्रीकांत जाधव, आकाश हलगेकर, पत्रकार सागर चौगुले, दीपक सुतार
▶️ दुसरा सामना
रेहान स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. मीडिया 11 संघाने 8 षटकांत 54/6 धावा केल्या.
प्रवीण (14) आणि गणेश (10) यांनी काहीसा प्रतिकार केला.
झहीर आणि इम्रान यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
रेहान स्पोर्ट्सने 4 विकेट राखून सामना जिंकला.
▶️ तिसरा सामना
बूम बूम हुक्केरीने प्रथम फलंदाजी करत 55/9 धावा केल्या.
मैनो (18) आणि यझेफा (11) यांनी योगदान दिले.
शिवनेरी स्पोर्ट्सकडून आप्पा आणि अभी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
उत्तरात शिवनेरीने 4 षटकांतच लक्ष्य गाठत 8 विकेटने विजय मिळवला.
संदीपने 35 धावांची धडाकेबाज खेळी केली.
👉 सामनावीर: आप्पा
👉 पुरस्कार: सिद्राय मेत्री, मल्लेश चौगुले
▶️ चौथा सामना
गोल्डन स्पोर्ट्सने 6 षटकांत 33/6 धावा केल्या.
एमके स्पोर्ट्स बाळेकुंद्रीने सहज लक्ष्य गाठत 3 विकेट गमावत 34 धावा केल्या.
किरण (13) आणि राजू (8) यांनी योगदान दिले.
अजयने 3 विकेट घेत गोलंदाजीत चमक दाखवली.
👉 एमके स्पोर्ट्सचा 7 विकेटने विजय
👉 सामनावीर: मंजू
▶️ पाचवा सामना
एसजी रायगडने 8 षटकांत 35/9 धावा केल्या.
एमके स्पोर्ट्स बाळेकुंद्रीने 4 षटकांत 37 धावा करत एकतर्फी विजय मिळवला.
इराण्णा (19) याची आक्रमक फलंदाजी ठरली निर्णायक.
👉 एमके स्पोर्ट्सचा 10 विकेटने विजय
👉 सामनावीर: महांतेश
👉 पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान

