LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*निपाणी मॅरेथॉनमध्ये बेळगावच्या माजी सुभेदार मेजर चंद्रकांत कडोलकर यांचे दैदीप्यमान यश*

Advertisement
निपाणी | प्रतिनिधी
निपाणी येथे 21 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या गोल्ड प्लस रसाई हिल्स मॅरेथॉन 2025 स्पर्धेत बेळगावचा क्रीडाप्रेम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा अभिमानास्पद प्रत्यय पुन्हा एकदा आला. या मॅरेथॉनमध्ये बेळगावच्या हिंडलगा परिसरातील रहिवासी, निवृत्त सुभेदार मेजर व ऑनररी कॅप्टन चंद्रकांत कडोलकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत 56 वर्षावरील गटात 10 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

या मॅरेथॉन स्पर्धेत विविध वयोगटांतील असंख्य स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. कठीण ट्रॅक आणि आव्हानात्मक वातावरणातही चंद्रकांत कडोलकर यांनी जिद्द, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर उत्कृष्ट धावपटू म्हणून आपली छाप उमटवली.

सेनादलातील प्रदीर्घ सेवेनंतरही फिटनेस आणि क्रीडाक्षेत्राशी नाते जपणाऱ्या कडोलकर यांच्या या यशाबद्दल बेळगाव शहरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक नागरिक, माजी सैनिक संघटना आणि क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन करत तरुणांसाठी ते प्रेरणास्थान असल्याचे मत व्यक्त केले.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*