बेळगाव शहरात घरफोडीच्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात उद्योगबाग पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 4 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
8 मार्च 2026 रोजी उद्योगबाग परिसरातील एका नागरिकाने आपल्या घरात चोरी झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.
सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवत संशयितांचा शोध घेतला आणि अखेर दोन आरोपींना ताब्यात घेतले.
अटकेत घेतलेल्या आरोपींनी उद्योगबाग तसेच इतर परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी वाहने आणि मोबाईल फोन असा एकूण 4.59 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

