*चलवेनहट्टी येथे काजू झाडांना आग*
चलवेनहट्टी येथील गुड्डादेवी मंदिर परिसरात चलवेनहट्टीचे शेतकरी चंद्रकांत आलगोंडी यांच्या शेतातील झोपडीला अज्ञाताकडून मध्यरात्रीच्या सुमारास आग लातवण्यात आली असल्याचे आले. सदर झोपडीचा वापर शेतीची औजारे व इतर साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत होता. त्यामुळे या झोपडीसह झोपडीतील शेती विषयक साहित्य जळुन खाक झाले आहे. तसेच झोपडीला लागलेल्या आगीत आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या काजूचे झाडे मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली यामध्ये छोटी रोपं देखील मोठ्या प्रमाणात जळाली आहेत.
गुड्डादेवी मंदिर परिसरात काजूच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्याने बाहेरली युवकांकडून या ठिकाणी मांसाहारी पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते आणी या पार्टीत.दारु पिणे भांडणं तट्टे करुण बाटल्या फोडणे सिगारेट पिणे आसे प्रकार तळीराम युवकांकडून केले जाता नशेत तर्रर्र असलेल्या युवकांकडून सिगारेट ओढलेली थोटके कुठेही फेकले जातात आणी आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. या भागातील पार्ट्यांचे आयोजन करणारे हुल्लडबाज युवक शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे. तर या भागात पोलिस प्रशासनाच्या वतीने गस्त वाढवावी जेणेकरून तळीरामाना आळा बसेल अशी मागणी चलवेनहट्टी अगसगे अतिवाड व बेकीनकेरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

