LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*शहापूरच्या चितामणराव शाळेच्या शताब्दी सोहळ्याचा 27-28 डिसेंबरला समारोप*

Advertisement
बेळगाव | प्रतिनिधी
शहापूर येथील ऐतिहासिक सरकारी चितामणराव हायस्कूल आणि पदवीपूर्व महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाचा भव्य समारोप दि. 27 व 28 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, या शाळेच्या शताब्दी महोत्सवाची सुरुवात सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते करण्यात आली होती. आता या ऐतिहासिक सोहळ्याचा समारोप शहापूरमध्ये विविध कार्यक्रमांनी होणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून शहापूरच्या सामाजिक व शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारी ही शाळा पूर्वी मराठी, कन्नड, इंग्रजी व उर्दू माध्यमांतून शिक्षण देत होती. आज ही संस्था द्वितीय पीयूसीपर्यंत उन्नत झाली असून, संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातील मोजक्या जुन्या शासकीय शाळांपैकी एक म्हणून तिचा गौरव केला जातो.

दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत माजी विद्यार्थ्यांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता सांगली संस्थानचे महाराज चितामणराव पाटवर्धन यांनी शाळेसाठी उपलब्ध करून दिलेल्या खासगी कार्यालया संदर्भात त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

या समारोप कार्यक्रमाला महापौर मंगेश पवार, लोकसभा सदस्य जगदीश शेट्टर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहितीही आमदार अभय पाटील यांनी दिली.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*