LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बिजगर्णी गावात युवकांचा स्तुत्य स्मशानभूमी स्वच्छता उपक्रम*

Advertisement
बिजगर्णी गावात युवकांचा स्तुत्य स्मशानभूमी स्वच्छता उपक्रम

बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील तरुणांनी सामाजिक जाणीव आणि बांधिलकीचा आदर्श ठेवत गावातील स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला. पावसाळ्याच्या काळात गवत, झाडे-झुडपे वाढल्याने आणि कचरा साचल्याने नागरिकांना अंत्यविधीच्या वेळी अडचणी निर्माण होत होत्या.

या परिस्थितीवर उपाय म्हणून ब्रम्हालिंग युवक मंडळ, तिरंगा युवक मंडळ, श्री गणेश भांडी संघ आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. झाडू, फावडे, खोरे, खुरपे यांसारख्या साधनांचा वापर करून परिसरातील गवत व कचरा हटवण्यात आला.  https://youtube.com/shorts/RLgVDNnICFQ?si=fh8W8fZBNB6ziGVJ

कोणतेही आर्थिक लाभ न पाहता केवळ सामाजिक जबाबदारीतून राबविलेला हा उपक्रम गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. या मोहिमेत अनेक ग्रामस्थ, युवक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की अशा उपक्रमांमुळे गावाचे सौंदर्य वाढते, स्वच्छता टिकते आणि गावपण जपले जाते. या मोहिमेत मनोहर बेळगावकर, निंगाप्पा जाधव, बबन जाधव, संतोष कांबळे, मनोहर पाटील, परशरम जाधव, रमेश भाषकलं, सागर नाईक, यल्लाप्पा तारिहालकर, रामचंद्र मोरे, अप्पाजी निलजकार, सुनील बचिकार, मोहन सावी, दयानंद बिर्जे, राजू जाधव, गोपाळ बेळगावकर, अशोक तारिहालकर, भाऊ जाधव, विनोद खांडेकर, चेतन अष्टेकर, सागर जाधव यांसह अनेकजण सहभागी झाले होते.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*