चलवेनहट्टी येथे नुतून शाळा सुधारणा समितीची रचना
चलवेनहट्टी प्राथमिक मराठी शाळेच्या नुतून शाळा सुधारणा समितची रचना नुकताच करण्यात आली शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी मनोहर हुंदरे यांची फेरनिवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी नंदिनी कंलखाबकर यांची निवड करण्यात आली ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्देनवर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया करण्यात आली पालक म्हणून महीला आपल्या पाल्याकडे अधिक लक्ष देत असतात त्यामुळे शाळेच्या विकासासाठी अधिक वाव मिळण्यास मदत होत असल्याने शाळा सुधारणा समितीमध्ये महिलांची सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय उपस्थिताच्या वतीने घेण्यात आला व तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.अत्यत खेळीमेळीत निवड झालेल्या शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून मनोहर हुंदरे उपाध्यक्ष नंदिनी कंलखाबकर
सदस्य नामदेव पाटील, विठ्ठल कंलखाबकर, बाबू सनदी, सतिश होसूरकर, हाल्लाप्पा आलगोंडी, कविता हुंदरे,लक्ष्मी पाटील, रेणुका आलगोंडी,नंदा पाटील, जयश्री पाटील,दिपा पाटील, सरीता पाटील,लक्ष्मी बडवाणाचे, मनाली हुंदरे, मंगल पाटील, रेणुका तानाजी आलगोंडी,अशी नुतून शाळा सुधारणा समितीची नेमणूक केली यावेळी पी.डी.ओ सुनिता पाटील, मुख्याध्यापक एम.सी. वार्णुळकर ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा पाटील शिक्षण प्रेमी भरमा आलगोंडी, लक्ष्मण बडवाणाचे, सह पालक वर्ग तसेच शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

