LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कंग्राळी बी.के. येथील भाविकांचा सौंदत्ती रेणुका यात्रेसाठी भक्तिभावपूर्ण प्रस्थान*

Advertisement
बेळगाव | प्रतिनिधी

कंग्राळी बी.के. गावातून तीन वर्षांतून एकदा निघणारी पारंपरिक फरशी आज बुधवार, दि. 31 डिसेंबर रोजी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी रवाना झाली.

या यात्रेसाठी गावातील रेणुका भक्त महिला भगिनींसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ठरल्याप्रमाणे सकाळी चव्हाटा सर्कल येथून यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी कलमेश्वर मंदिर, लक्ष्मी मंदिर, गणपती मंदिर तसेच लक्ष्मी पावले असलेल्या स्थळांवर विधीपूर्वक पूजा, कापूर आरती व उद्गार घालून धार्मिक परंपरेनुसार देवांना पाणी ठेवण्याचा विधी पार पाडण्यात आला.

या भक्तिमय सोहळ्याला देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष मारुती पाटील, मल्लाप्पा पाटील, यल्लाप्पा हारजे, बाळू पाटील, राजू चव्हाण, महादेव पाटील, राजू तलवार यांच्यासह देवस्थान पंच समिती, देवस्थान सेवा समिती, लक्ष्मी उत्सव कमिटी तसेच ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती लाभली.

लक्ष्मी उत्सव कमिटीचे अध्यक्ष जयराम पाटील, सदस्य अनिल पावशे, नवनाथ पुजारी, उमेश पाटील, दत्ता पाटील , नेताजी पाटील आदींसह अनेक ग्रामस्थ या प्रसंगी सहभागी झाले होते.

देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. 3 जानेवारी (पौर्णिमा) रोजी सर्व भाविक सौंदत्ती येथे एकत्र पडल्या भरण्याचा कार्यक्रम, तर मंगळवार दि. 6 जानेवारी रोजी गावात परतल्यानंतर कंग्राळी बी.के. येथे पारंपरिक पडल्या भरणे जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

ही यात्रा गावाच्या श्रद्धा, परंपरा व एकात्मतेचे दर्शन घडविणारी ठरत असून संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*