बेळगाव (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्री विठ्ठल मंदिर महिला भजन मंडळाच्या वतीने अत्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय शंकर पाटील गुरुजी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारत मातेला पुष्परचन केले.
यानंतर महिला भजन मंडळाच्या सदस्यांनी “राम कृष्ण हरी” या गजरात सुंदर अभंग व भजन सादर करून श्री विठ्ठल मंदिरामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण केले.
समाजातील सर्व घटकांना समान न्याय, स्वातंत्र्य व बंधुता मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
महिला मंडळाच्या सदस्यांनी सामाजिक समतेचा संदेश देत शिक्षण, स्वावलंबन व संघटित शक्ती यांचे महत्त्व लक्षात घेऊन बाबासाहेबांची जयंती उत्साहाने साजरे केले .अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता व जागृती निर्माण होते, असे मत गुरुजींनी व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास परिसरातील महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला मंडळाच्या अध्यक्षा रूपाली सव्वाशेरी यांनी उपस्थितितांचे आभार मानले

