जी एस एस पी यु काॅलेजच्या विद्यार्थ्याची शैक्षणिक यात्रा
विद्यार्थी वर्गाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने अभ्यासा व्यतिरिक्त अन्य क्षेत्राची माहिती देण्याच्या उद्देशाने पी यु सी प्रथम आणि व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्याना ,आंगडी इनस्टीट्यूट ऑफ टेक्नालाॅजी (तंत्रज्ञान )आणि मॅनेजमेंट (व्यवस्थापन)च्या रोबोटिक्स विभागाला भेट देउन, या यंत्रमानवाची निमिर्ती, आणि निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान याची सखोल माहिती विद्यार्थी वर्गाने प्राप्त केली.
प्रो.सागर बिर्जे आणि सहकार्यानी ड्रोन, आणि रिसायकलीग मशीन ज्याचे निर्माण आर्टीफीशिअल एन्टलीजेन्सीच्या विद्यार्थ्यांनी केले याची पूर्ण माहिती दिली.
रोबोटिक्स विभाग प्रमुख डाॅ पूजा अनगोळकर यांनी यंत्रमानवाशी संबंधित माहिती दिली. यंत्रमानवाची कार्यपद्धतीची सखोल माहिती दिली.
जी एस एस पी यु काॅलेज विद्यार्थी वर्गाने विविध विभागाना भेट देऊन सविस्तर माहिती जमा केली .
या अभ्यास यात्रेचे आयोजन संगणक विभाग प्रमुख प्रा सोनिया चिठ्ठी आणि प्रा. दत्तात्रय जोशी यांनी प्राचार्य एस एन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली केले
या अभ्यास यात्रे मुळे विद्यार्थी आपल्या भविष्यात योग्य निर्णय घेतील

