LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*महिला दिनानिमित्त भाजप महिला मोर्चाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम*

Advertisement
बेळगांव :महिला सक्षमीकरणाचा संदेश देत भाजप महिला मोर्चा महानगर आणि उत्तर मंडळ यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महानगर महिला मोर्चाच्या अध्यक्षा कु. शिल्पा केकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शीला गडकरी यांनी उपस्थितांचे स्वागत करून मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या न्यूट्रिशन तज्ञ डॉ. स्फूर्ती मास्तीहोळी यांनी महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी योग्य आहार, योगाचे महत्त्व, आरोग्यदायी खाण्याच्या सवयी तसेच मिलेट्स, प्रोटीन आणि श्रीधान्य यांच्या सेवनाचे फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी कर्नाटक तसेच देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या महिला खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सिमरन गुंडकल, मंजिरी बीजी, ईशा पाटील, हेमालता काकतीकर आणि रोहिणी पाटील या खेळाडूंना विशेष गौरविण्यात आले.

कार्यक्रमात महिला मोर्चाच्या अध्यक्षा शिल्पा केकरे यांनी प्रास्ताविक करत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगला अंगडी, गीता सुतार, उपमहापौर वाणी जोशी, उज्वला बडवन्नाचे तसेच नगरसेविका सविता मुरगेंद्र पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी कविता हीरेमठ यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*