बेळगाव | KLE सोसायटीच्या बी. व्ही. बेल्लड लॉ कॉलेजच्या वतीने कर्नाटक स्टेट लॉ युनिव्हर्सिटीची अॅथलेटिक सिलेक्शन ट्रायल शुक्रवारी (५ डिसेंबर २०२५) लिंगराज कॉलेज ग्राउंड, बेळगाव येथे उत्साहात पार पडली. हुब्बळी विभागातील १८ महाविद्यालयांमधील तब्बल १६० स्पर्धकांनी विविध अॅथलेटिक प्रकारांमध्ये आपली क्षमता आजमावली.
या निवड चाचणीमध्ये 100m, 200m, 400m, 800m, 1500m, 5000m धावणे, लांब उडी, उंच उडी, ट्रिपल जंप, गोळाफेक, डिस्कस थ्रो, भालाफेक आणि 4x400m रिलेसह एकूण १४ स्पर्धांचा समावेश होता. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. खालिद खान, संचालक – शारीरिक शिक्षण, कर्नाटक स्टेट लॉ युनिव्हर्सिटी, हुब्बळी यांच्या हस्ते झाले.
प्राचार्या डॉ. (सौ.) ज्योती जी. हिरेमठ यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर डॉ. ऋचा राव, शारीरिक शिक्षण संचालिका, यांनी सर्व स्पर्धांचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली.
कार्यक्रमाला डॉ. जी. एन. पाटील (माजी शारीरिक शिक्षण संचालक, आर.एल. सायन्स इन्स्टिट्यूट),
डॉ. जगदीश गस्ती (संचालक – क्रीडा, राणी चन्नम्मा विद्यापीठ) यांसह १५ क्रीडा अधिकारी, सर्व टीम मॅनेजर्स, शिक्षकवर्ग व यजमान महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
दिवसभर चाललेल्या या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी दाखवत राज्यस्तरीय निवडीसाठी आपले कौशल्य सिद्ध केले.

