Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे : राहुल जारकीहोळी

सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे : राहुल जारकीहोळी

बेळगाव : सहकारी बँकांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ठेवीदारांचा विश्वास जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे मत बीडीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
बेलगाव येथील बीडीसीसी बँकेच्या सभागृहात कर्नाटक राज्य सहकार महासंघ आणि बेलगाव जिल्हा सहकारी युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पतसंस्था आणि कर्मचारी पतसंस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठीच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
राहुल जारकीहोळी म्हणाले की, सहकारी बँकांमध्ये नागरिकांनी ठेवलेल्या ठेवी सुरक्षित राखणे आणि गरजेच्या वेळी त्यांची परतफेड करणे ही प्रत्येक संस्थेची प्राथमिक जबाबदारी आहे. पारदर्शक आणि जबाबदार कारभारातून जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याची आवश्यकता असून, त्यामुळे सहकारी बँकांमध्ये गुंतवणूक वाढण्यास मदत होईल.news_1785417207_1_605.webpयावेळी बेलगाव विभागाचे सहकारी संस्थांचे संयुक्त निबंधक कल्लप्पा ओबण्णगोळ यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना बँकिंग व्यवहार, कर्जवाटप, व्याजदर व्यवस्थापन आणि नियमन यासाठी सातत्याने प्रशिक्षण आवश्यक असल्याचे सांगितले. "ठेवीदार हेच आपल्या संस्थांचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या पैशाचा जबाबदारीने वापर करून सहकारी क्षेत्राची प्रगती साधली पाहिजे," असे त्यांनी नमूद केले.
कर्नाटक राज्य पतसंस्था महासंघाचे संचालक संजय होसमठ यांनी कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार नियमांचे पालन करूनच करावेत, असे सांगत सहकारी संस्थांनी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व कायम राखणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
या प्रशिक्षणात निवृत्त सहकार विभागाचे अपर निबंधक डॉ. गुरुस्वामी आणि संयुक्त निबंधक कल्लप्पा ओबण्णगोळ यांनी सहकारी संस्थांच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन केले.news_1785417207_2_277.webpकार्यक्रमाला जिल्हा सहकारी युनियनचे अध्यक्ष बसगौडा पाटील, उपनिबंधक रवींद्र पाटील, हाळप्पा जग्गीणवर, उमेश बाळी, तम्मण्णा केंचरेड्डी, जबीउल्ला काझी, बीडीसीसी बँकेचे सीईओ एन. बी. कलावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*