LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*महानगरपालिकेत महिला क्रिकेट विश्वविजयाचा उत्साह*

Advertisement
महानगरपालिकेत महिला क्रिकेट विश्वविजयाचा उत्साह

बेळगांव:भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विश्वविजयानिमित्त बेळगांव महानगरपालिकेच्या वतीने शहरात अनोख्या पद्धतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे — बेळगांवातील बालकांच्या क्रिकेट संघाने महापालिकेत केक कापून महिला संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला.

या कार्यक्रमाला महापौर मंगेश पवार, उपमहापौर सौ. वाणि जोशी,आयुक्त सौ. बी. शुभा,पक्षनेते श्री. हणमंत कोंगाळी, विरोधी पक्षनेते सोहेल संगोळी तसेच नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महापौर मंगेश पवार यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले, “भारतीय महिला क्रिकेटपटूंनी संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला आहे. त्यांच्या संघर्ष, आत्मविश्वास आणि मेहनतीतून आजच्या पिढीतील प्रत्येक मुलीला प्रेरणा मिळेल,” असे ते म्हणाले.

उपमहापौर वाणि जोशी यांनीही महिला शक्तीच्या या कामगिरीचे कौतुक करत, क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी भारतीय महिला संघाच्या यशासाठी आणि देशाच्या क्रीडा गौरवासाठी शुभेच्छा दिल्या.
महापालिकेच्या या उपक्रमाचे शहरवासीयांकडून कौतुक होत असून, “महिलांचा विजय म्हणजे राष्ट्राचा अभिमान” असा संदेश या सोहळ्याद्वारे देण्यात आला.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*