खानापूर तालुक्यातील हुळंद गावाजवळील माळ रानात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला उपचारासाठी बेळगावात दाखल करण्यात आले आहे.
वासुदेव गावडे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.वासुदेव गावडे हा गंभीर जखमी झाला असुन त्याच्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली आहे. अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची माहिती कळताच वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले. त्यांनी त्वरित जखमी शेतकऱ्याला जांबोटी आरोग्य केंद्रात हलवून तेथे प्रथमोपचार केले. पुढील उपचारासाठी बेळगाव येथील विजय हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.खानापूर तालुक्यात घनदाट जंगल असल्याने वन्य प्राण्यांचा वावर आहे.गेल्या काही महिन्यात अस्वलाने हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वन खात्याने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी खानापूर तालुक्यातील जनता करत आहे. शेतात काम करत असताना अस्वले हल्ला करत असल्याने जंगल परिसरात असलेल्या शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत.
https://youtube.com/shorts/54KkaQzcArc?si=_CYDNIpMYZeWnl4P

