बेळगाव : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून बेळगाव ग्रामीण जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम बेळगाव ग्रामीण जिल्हा भाजप कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व भारतमातेच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. हे पूजन खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय ध्वज फडकावत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बेळगाव ग्रामीण जिल्हा भाजप अध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष ज्योती कत्ती, मृगेंद्रगौडा पाटील, मनोज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी एकत्र येत राष्ट्रभक्तीपर घोषणा दिल्या आणि संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प केला.
हा कार्यक्रम पक्षाच्या संघटनात्मक बांधिलकीचे तसेच देशप्रेमाचे प्रतीक ठरला, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

