LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*स्विमर्स क्लब बेळगावच्या चार जलतारकांनी पटकावली ९ पदके*

Advertisement
स्विमर्स क्लब बेळगावच्या चार जलतारकांनी पटकावली ९ पदक; एक नवा राष्ट्रीय विक्रमही

दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा व खेळ स्पर्धेत (School Games Federation of India) बेळगावच्या स्विमर्स क्लब बेळगाव आणि अ‍ॅक्वेरियस स्विम क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत शहराच्या क्रीडा इतिहासात मानाचा ठसा उमटवला आहे.
ही राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धा २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२५ (मुलांसाठी) आणि १२ ते १७ डिसेंबर २०२५ (मुलींसाठी) दिल्ली येथे पार पडली. या स्पर्धेत बेळगावच्या चार जलतारकांनी मिळून एकूण ९ पदकांची कमाई केली असून त्यात ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे.
🏅 पदक विजेत्यांचा तपशील :
🔹 समृद्धी हलकरे (अंडर-१७ गट)
▪️ 200 मीटर बॅकस्ट्रोक – 🥇 सुवर्ण
▪️ 4x100 मीटर मेडले रिले – 🥇 सुवर्ण
▪️ 4x100 मीटर फ्रीस्टाईल रिले – 🥉 कांस्य
🔹 अमन सुनगार (अंडर-१९ गट)
▪️ 4x100 मीटर मेडले रिले – 🥇 सुवर्ण
▪️ 100 मीटर बॅकस्ट्रोक – 🥈 रौप्य
▪️ 200 मीटर बॅकस्ट्रोक – 🥈 रौप्य
🔹 सुनिधी हलकरे (अंडर-१९ गट)
▪️ 200 मीटर बॅकस्ट्रोक – 🥈 रौप्य
▪️ 100 मीटर बॅकस्ट्रोक – 🥉 कांस्य
🔹 वेदांत मिसाळे (अंडर-१४ गट)
▪️ 4x100 मीटर मेडले रिले – 🥇 सुवर्ण
▪️ नवीन राष्ट्रीय विक्रम : 4 मिनिटे 20 सेकंद
(मागील विक्रम – 4:25)

हे सर्व खेळाडू सुवर्ण JNMC ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आणि KLE इंटरनॅशनल स्विमिंग पूल, बेळगाव येथे नियमित सराव करत असून, त्यांना उमेश काळघाटगी यांच्या मार्गदर्शनाखाली
अक्षय शेरगर, अजिंक्य मेंढे, नितीश कुदुचकर, गोवर्धन काकतकर, इमरान उचगांवकर आणि विनायक अंबेवाडिकर या प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

या यशामागे डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष – KLE सोसायटी),श्री. जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष – जयभारत फाउंडेशन),आर.टी.एन. अविनाश पोतदार,सौ. मॅनेक कपाडिया,सौ. लता किट्टूर,सुधीर कुसाणे,प्रसाद तेंडुलकर
यांच्यासह असंख्य क्रीडाप्रेमींचा सततचा पाठिंबा लाभल्याचे सांगण्यात आले.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*