सुतार बांधवांसाठी सुवर्णसंधी; SSAF फाउंडेशनकडून मोफत विमा पॉलिसी उपक्रम
सुतार समाजाच्या सुरक्षिततेसह त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन (SSAF) यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्व सुतार व त्यांच्या कामगारांना मोफत विमा पॉलिसी देण्यात येणार आहे.
दैनंदिन कामकाजात सुतारांना विविध प्रकारच्या अपघातांचा धोका संभवतो. ही बाब लक्षात घेऊन सुतार बांधवांना आर्थिक सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या विमा पॉलिसीमुळे सुतार व त्यांच्या कुटुंबीयांना भविष्यातील अनपेक्षित संकटांना सामोरे जाताना मोठा आधार मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक सुतारांनी आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो आवश्यक कागदपत्रांसह ३१ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी इच्छुकांनी कन्स्ट्रक्शन जंक्शन, गुड शेफर्ड स्कूल समोर, गणेशपूर रोड, बेळगाव येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 8618993767 या क्रमांकावर संपर्क करता येईल.
सुतार बांधवांनी आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन SSAF फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

