बेळगाव | जानेवारी 2026
एशिया पॅसिफिक डाऊन सिंड्रोम फेडरेशन गेम्स 2026 जलतरण स्पर्धेत बेळगावची कुशल जलतरणपटू बुशरा फातिमा मुजावर हिने उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा स्पेशल ऑलिम्पिक्स भारत यांच्या सहकार्याने चेन्नई येथील नेहरू स्टेडियम येथे पार पडली.
स्विमर्स क्लब बेळगाव व अक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे प्रतिनिधित्व करत बुशरा हिने
🔹 100 मीटर फ्रीस्टाइल – सुवर्ण पदक
🔹 50 मीटर फ्रीस्टाइल – रौप्य पदक
अशी दमदार कामगिरी सादर केली.
या स्पर्धेत आशिया पॅसिफिक क्षेत्रातील विविध देशांतील डाऊन सिंड्रोम असलेल्या खेळाडूंनी सहभाग नोंदवत क्रीडाक्षमता, आत्मविश्वास आणि समावेशकतेचा जागर केला.
राज्य व राष्ट्रीय स्तरावर याआधीच आपली छाप सोडलेल्या बुशरा हिने
राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत ३ रौप्य पदके
आणि
राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत ३ रौप्य पदके
जिंकत सातत्यपूर्ण यश मिळवले होते. या कामगिरीच्या जोरावर तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली आणि तिने ती संधी सोन्यात रूपांतरित केली.
बुशरा सध्या बेळगाव येथील सुवर्णा JNMC ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावात कठोर प्रशिक्षण घेत असून, उमेश कालघाटगी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक अक्षय शेरगर, अजिंक्य मेंढे, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर, इमरान उचगावकर व विनायक अंबेवाडिकर
यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशामागे डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष – KLE सोसायटी), श्री. जयंत हुमरवाडी (अध्यक्ष – जयभारत फाउंडेशन), रोटेरियन अविनाश पोतदार, सौ. मॅनेक कपाडिया, सौ. लता किट्टूर, सुधीर कुसणे, प्रसाद तेंडोलकर तसेच अनेक हितचिंतकांचा मोलाचा पाठिंबा लाभल्याचे नमूद करण्यात आले.
बुशराच्या या कामगिरीमुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, विशेष गरजा असलेल्या खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे.

