बेळगाव | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना एव्हिएशन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्कायवर्ड एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकॅडमीच्या वतीने नुकतेच कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले होते. हा कॅम्पस इंटरव्यू अकॅडमीच्या गोंधळी गल्ली येथील कार्यालयात पार पडला.
या मुलाखत प्रक्रियेत अकॅडमीतील एकूण २६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विविध फेऱ्यांनंतर त्यापैकी १८ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. निवड झालेले विद्यार्थी येत्या काही दिवसांत आपल्या नियुक्तीस्थळी कामावर रुजू होणार आहेत.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना Enclam Hospitality Private Limited या नामांकित कंपनीत नोकरीची संधी मिळाली असून, त्यांची नियुक्ती गोवा येथील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली आहे. ही संधी विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी महत्त्वाची आणि सुवर्णसंधी मानली जात आहे.
https://youtu.be/1D_GuGAzf1c?si=wHm4K_u7zDvR5MI-
स्कायवर्ड एव्हिएशन अकॅडमीने विद्यार्थ्यांना एव्हिएशन क्षेत्रातील दर्जेदार आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले असून, त्याच प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम या कॅम्पस इंटरव्यूतून दिसून आला. नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी स्कायवर्ड एव्हिएशनचे व्यवस्थापकीय संचालक विनोद बामणे यांचे मनापासून आभार मानले.
एव्हिएशन क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ घडवण्याचे कार्य स्कायवर्ड एव्हिएशन अकॅडमी सातत्याने करत असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या कॅम्पस इंटरव्यू व रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा मानस अकॅडमी व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

