*मा.डाॅ. जयसिंगराव पवार यांची मराठी विद्यानिकेतन शाळेला सदिच्छा भेट*
गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील आघाडीचे इतिहास संशोधक ,इतिहासकार, समाज प्रबोधक, इतिहासाचे नामवंत प्राध्यापक माननीय डॉ . जयसिंगराव पवार यांनी मराठी विद्यानिकेतन शाळेला सदिच्छा भेट दिली .
यावेळी त्यांच्या पत्नी वसुधा पवार तसेच इतिहास संशोधक मंजुश्री पवार (कोल्हापूर ),या वर्षाचा गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते किशोर ढमाले आणि प्रतिमा परदेशी(पुणे) आदी मान्यवर उपस्थित होते.मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सर्व मान्यवरांनी शाळेचे सर्व शैक्षणिक विभाग, शाळेचे उपक्रम,शाळेचे कामकाज ,मुलांमध्ये असलेली मोठ्यांविषयी आदराची भावना या सर्व गोष्टी पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रा.आनंद मेणसे, प्रा. सुरेश पाटील,शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर, गौरी चौगुले, इंद्रजीत मोरे उपस्थित होते.

