LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*चलवेनहट्टीत जेष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर यांचा भव्य सत्कार*

Advertisement
चलवेनहट्टी | प्रतिनिधी

पर्यावरण संवर्धन, समाजसेवा आणि लोककल्याणासाठी आयुष्य वाहून घेतलेले जेष्ठ समाजसेवक शिवाजी दादा कागणीकर यांचा भव्य सत्कार सोहळा चलवेनहट्टी येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मस्णांगाई सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, रविवार दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील मराठी शाळेच्या प्रांगणात पार पडणार आहे.

शिवाजी दादा कागणीकर यांना नुकतेच राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक, पर्यावरणीय आणि शैक्षणिक योगदानाची दखल म्हणून हा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

मस्णांगाई सौहार्द सोसायटीच्या वतीने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. त्याच प्रेरणेतून यावर्षी समाजकार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या जेष्ठ समाजसेवकाचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले.

या सत्कार सोहळ्यासाठी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सेक्रेटरी, सर्व संचालक मंडळ, सल्लागार मंडळ व कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत. तसेच पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते, युवक मंडळे, महिला मंडळे व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री मस्णांगाई सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*