बेळगाव (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत समाजातील समानता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांचा पुनरुच्चार केला. कार्यक्रम साध्या पण भावपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्यासह शिवराज पाटील, उमेश पाटील, सुहास हुद्दार, श्रीकांत कदम, सुहास चौगुले आदी उपस्थित होते.

