बेळगांव: दररोज चूल पेटण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांना देखील दिवाळीचा आनंद मिळावा या उद्देशाने
दिवाळीचे औचित्य साधून फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि रेनबो कलेक्शन यांच्यातर्फे चारशेहून अधिक महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले.
भाजी विक्रेत्या, भंगार गोळा करणाऱ्या, फुले विक्री करणाऱ्या, सफाई कर्मचारी, मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या महिलांना देखील फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि रेनबो कलेक्शन यांनी दिवाळी निमित्त साडी भेट देऊन या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित केला.
गेल्या पाच वर्षांपासून फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि रेनबो कलेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने कष्ट करून उपजीविका करणाऱ्या महिलांना दरवर्षी दिवाळी सणाला साडीची भेट देण्यात येते. फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि रेनबो कलेक्शन यांच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

