LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*शेजाऱ्यांचा छळ वाढला; डॉक्टरांनी पोलिसांत धाव घेतली*

Advertisement
बेळगावच्या टिळकवाडी परिसरातील क्लासिक मॅनोर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टर दाम्पत्याने शेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींविरोधात गंभीर आरोप करत पोलिसांकडे धाव घेतली आहे. विनाकारण त्रास देणे, शिवीगाळ करणे, तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देत बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

डॉ. रुपेश साळुंखे आणि डॉ. संध्या नेर्लेकर हे या अपार्टमेंटमध्ये राहत असून तळमजल्यावर त्यांनी मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू केले आहे. त्याच इमारतीत राहणाऱ्या काही जणांकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोणताही वाद किंवा जुने वैमनस्य नसताना केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने काही व्यक्ती वारंवार गैरवर्तन करत आहेत. रुग्णांसमोर अपमानास्पद भाषा वापरणे, शिवीगाळ करणे आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचे प्रकार घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे टेरेसवर पाहणी करण्यासाठी गेलेल्या डॉ. साळुंखे यांच्यावर काही जणांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत त्यांच्या हाताला दुखापत झाली असून धारदार वस्तूने वार केल्याची नोंद करण्यात आली आहे.
या सर्व प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या डॉक्टर दाम्पत्याने पोलीस आयुक्त आणि टिळकवाडी पोलीस स्थानकात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*