बेळगाव: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्याना कंग्राळी खुर्द येथे अभिवादन करण्यात आले.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या कंग्राळी खुर्द येथील हुतात्मे मारुती बेन्नाळकर व बाळू निलजकर यांना आज महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाशिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
हुतात्मा बाळू निलजकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या फलकाचे पूजन वकील सुधीर चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी केले.
यानंतर हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला माजी आमदार मनोहर किणेकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. सभेत वक्त्यांनी सीमा लढ्यातील बलिदानाची आठवण करून देत, हा संघर्ष अद्याप संपलेला नसल्याचे सांगितले.
सीमाप्रश्न सोडवणूक हिच हुतात्म्याना खरी आदरांजली ठरेलं अशी भावना यावेळी वक्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

