ग्वाल्हेर (म.प्र.) येथे झालेल्या CBSE National Karate Championship मध्ये बेळगावची प्रतिभावान खेळाडू श्रद्धा सूर्यवंशी (अंगडी इंटरनॅशनल स्कूल) हिने सुवर्णपदक जिंकत अभूतपूर्व इतिहास रचला आहे.
स्पर्धेच्या थरारक अंतिम फेरीत इयत्ता 9 वीतील या कराटेपटूने विद्यमान ‘आशियाई विजेत्याला’ पराभूत करत मोठा सनसनाटी निकाल नोंदवला. हा संपूर्ण स्पर्धेतील सर्वात मोठा अपसेट मानला जात आहे.
श्रद्धाच्या या भव्य यशामागे HOD महादेव शिरगावकर सर व कराटे प्रशिक्षक राजू राजपूत सर यांचे कसून मार्गदर्शन, संघटित प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले. महिनोंच्या मेहनतीनंतर आज यशाचा सुवर्णक्षण तिच्या हातात आला.

