बेळगांव:कंग्राळी बुद्रुक गावात होणारी लक्ष्मी देवीची यात्रा २८ एप्रिल २०२६ रोजी नियोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आज रविवारी देणगीदारांचा गावातील लक्ष्मी देवी मंदिरामध्ये यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात देवी पूजेनं झाली. त्यानंतर यात्रा कमिटी अध्यक्ष जयराम पाटील, उपाध्यक्ष अनिल पावशे व सदस्यांच्या हस्ते देणगीदारांचा श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी अनेक दानशूरांनी देणगी दिली. त्यामध्ये –
कॉन्ट्रॅक्टर किरण लक्ष्मण तराळे व ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब कल्लाप्पा बद्दरगडे यांच्याकडून एक तोळा सोने
माजी सैनिक संजय कृष्णा जांबोटकर – ₹११,०००
माजी सैनिक अरुण धाकलू पाटील – ₹५,०११
कॉन्ट्रॅक्टर अजित पाटील – ₹११,००१
कॉन्ट्रॅक्टर राजू कृष्णा चिखलकर – ₹५,१००
ग्रामपंचायत सदस्या वंदना यल्लाप्पा चव्हाण – ₹११००१
श्रीधर मोहन बसरीकट्टी – ₹१०११०
दिनेश मारुती खांडेकर – ₹१०११
देणगीदारांच्या योगदानामुळे यात्रेच्या आयोजनाला बळ मिळणार असल्याचे कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या सोहळ्याला गावातील मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य व भाविक उपस्थित होते.
https://youtube.com/shorts/L-EIecGtfRw?si=rT_4V4bkgHSCAJ9Z

