अपघात झाल्यावर कारला आग लागल्याने कारमधील पोलीस निरीक्षकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री धारवाड जवळ घडली.
पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ हे कार मधून एकटेच गदग येथून विवाह समारंभाला उपस्थित राहून धारवाडला परत येत होते. कारमधून परत येत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला आदळली. कार डिव्हायडरला आढळल्यावर कारणे लगेच पेट घेतला. त्यामुळे त्यामुळे सालीमठ यांना सालीमठ यांना सालीमठ यांना कारमधून कारमधून बाहेर पडता आले नाही.
कारने चारही बाजूने पेट घेतल्यामुळे सालीमठ यांचा होरपळून मृत्यू झाला.आग इतकी भीषण होती की सालीमठ यांच्या मृतदेहाची राख झाली होती. घटनास्थळी असणाऱ्या लोकांनी पोलीस आणि अग्निशामक दलाला कळवले पण तोपर्यंत सालीमठ यांची राख झाली होती.

