कलबुर्गी : जेवरगी तालुक्यातील गौणहळ्ळी परिसरात झालेल्या भीषण अपघातात आयएएस अधिकारी आणि BESCOM चे व्यवस्थापकीय संचालक महांतेश बिलगी यांचे मंगळवारी अकस्मात निधन झाले. या अपघातात आणखी दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये शंकर बिलगी यांचाही समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बिलगी हे आपल्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी जात असताना त्यांचे इनोव्हा वाहन रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने स्वतःचाच अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने प्रशासकीय वर्तुळासह कर्नाटकात हळहळ व्यक्त केली जात आहे.

