Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*शिवाजीनगरमध्ये आमदार निधीतून आधुनिक जिमचे उद्घाटन*

बेळगावातील शिवाजीनगर परिसरात आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या नव्या जिमचे उद्घाटन आमदार Asif (Raju) Sait यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते Amaan Sait हेही प्रमुख उपस्थित होते.

स्थानिक युवकांना आधुनिक फिटनेस सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि युवकांना सकारात्मक उपक्रमांकडे वळवणे हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या जिममुळे परिसरातील युवक व नागरिकांना नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी युवकांमध्ये फिटनेस संस्कृती वाढवण्याची गरज अधोरेखित केली. क्रीडा आणि आरोग्याशी संबंधित सुविधा वाढवल्यास युवकांना सकारात्मक दिशा मिळते, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला पंच मंडळ, युवक मंडळाचे पदाधिकारी, महिला काँग्रेस नेत्या मीनल चौगुले, मशिनरी आयोजक शाहिद, स्थानिक नेते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजीनगरमध्ये आधुनिक जिम सुविधा सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले. या जिममुळे स्थानिक युवकांमध्ये फिटनेसबाबत उत्साह वाढेल आणि सामुदायिक सहभागालाही चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*