बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सैठ यांनी वैभवनगर येथील सरकारी शाळेत फ्लेवर्स बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन करून शैक्षणिक परिसर अधिक सुरक्षित आणि सुसज्ज बनविण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली.
या फ्लेवर्स मार्गामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना ये-जा सुलभ होणार असून, विशेषतः पावसाळ्यात चिखलामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर नियंत्रण येणार आहे. शाळेचा परिसर सुबक आणि सुरक्षित बनविण्याचा या कामांचा उद्देश असल्याचे आमदार सैठ यांनी सांगितले.
या प्रसंगी आमदार सैठ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिक्षण घेण्याचे आवाहन करत, “शिक्षण हे वैयक्तिक आणि सामाजिक प्रगतीचे भक्कम पाय आहे” असे सांगितले. तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमास युवक नेते अमान सैठ तसेच स्थानिक नागरिक व शिक्षणप्रेमी उपस्थित होते. सर्वांनी आमदार सैठ यांच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकटीसाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले.

