Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

“भारत स्वतंत्र झाला; पण प्रत्येक नागरिक खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे का?” — आकाश हलगेकर

बेळगाव : देशाच्या स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्याच्या उत्सवाबरोबरच समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचा सूर बेळगावमध्ये उमटला. “स्वातंत्र्य कुणासाठी?” असा सवाल उपस्थित करत समाजसेवक आकाश हलगेकर, दीपक केतकर, सुनील कोलकार, अमोल चौगुले आणि विनायक चंपन्नवर यांनी गांधी नगर परिसरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांसोबत सामाजिक न्यायाच्या मागणीसाठी जनजागृती केली.

देशाने राजकीय स्वातंत्र्य मिळवून आठ दशके पूर्ण केली असली, तरी गरिबी, बेरोजगारी, भूक, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक असमानता यांसारख्या प्रश्नांपासून सर्वसामान्य नागरिकांची पूर्ण मुक्तता अद्याप झालेली नाही, असा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.

“उपाशी व्यक्तीसाठी स्वातंत्र्याचा अर्थ काय?”

स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना समाजातील शेवटच्या घटकाचा विचार होणे आवश्यक आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कुटुंबाला, निवाऱ्याच्या शोधात असलेल्या व्यक्तीला किंवा रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणाला स्वातंत्र्याची अनुभूती कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

प्रत्येक नागरिकाला दर्जेदार शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगाराच्या संधी आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळणे आवश्यक आहे. केवळ ध्वजारोहण, देशभक्तीपर कार्यक्रम आणि घोषणांपुरते स्वातंत्र्य मर्यादित न राहता त्याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

“समाजातील शेवटच्या घटकाचे जीवनमान हाच विकासाचा खरा निकष”

देशाचा विकास केवळ रस्ते, इमारती किंवा आर्थिक आकडेवारीवर मोजता येणार नाही. गरीब कुटुंबाला दोन वेळचे अन्न, अनाथ मुलाला शिक्षण, निराधार वृद्धाला आधार आणि बेरोजगार युवकाला रोजगार मिळतो का, यावर विकासाचे खरे मोजमाप झाले पाहिजे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या वेळी गांधी नगर परिसरातील झोपडपट्टी भागातील रहिवाशांनी सामाजिक न्यायाच्या मागण्या मांडणारे फलक हातात घेतले. माध्यमांच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत या मागण्या पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर “भारत स्वतंत्र झाला आहे; मात्र प्रत्येक नागरिक स्वतंत्रपणे, सन्मानाने आणि समाधानाने जगत आहे का?” हा प्रश्न समाजासमोर ठेवण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक मिळेल, तेव्हाच स्वातंत्र्याचा खरा अर्थ पूर्णत्वास जाईल, असा संदेश यावेळी देण्यात आला.

— डी मीडिया | DMedia24

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*