*ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थिनींचा स्केटिंगमध्ये जागतिक विक्रम*
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी स्केटिंगमध्ये अभूतपूर्व कामगिरी करत 'एशियन' आणि 'यु.एस.ए. बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये (Asian and U.S.A. Book of Records) आपले नाव नोंदवले आहे.
इयत्ता सहावीतील लावण्या आणि इयत्ता तिसरीतील मनस्वी भंडारी या विद्यार्थिनींनी गोगटे सर्कल (Goaves) येथील रोटरी क्लबमध्ये १ तास २६ मिनिटे आणि २६ सेकंद सलग (Non-stop) स्केटिंग करून हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या सोनाली कंग्राळकर यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे विशेष कौतुक व अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या आणि संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

