Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*ज्योती सेंट्रल स्कूलच्या शिफाली कांबळेचे राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत घवघवीत यश*

बेळगाव | प्रतिनिधी

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. शाळेतील इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेली कु. शिफाली संतोष कांबळे हिने राष्ट्रीय स्तरावरील वैयक्तिक नृत्य स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

बीदर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘नॅशनल लेव्हल डान्स कॉम्पिटिशन (KWC Dance Competition)’ मध्ये देशभरातून सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये शिफालीने आपल्या बहारदार सादरीकरणाने परीक्षकांची विशेष दखल घेतली. तिच्या सशक्त भावअभिनय, तालबद्ध हालचाली आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला परीक्षकांकडून मोठी दाद मिळाली.

या यशाबद्दल शिफालीला मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र तसेच ७ हजार रुपये रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध कोरिओग्राफर कार्तिक प्रियदर्शन यांनी केले.

शिफालीच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेचे एस.एम.सी. चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. नितीन घोरपडे, मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर, शिक्षकवृंद तसेच पालकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शिफालीच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test 2*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*