कंग्राळी बी.के. | प्रतिनिधी :
कंग्राळी बी.के. गावातून तीन वर्षांतून एकदा निघणारी पारंपरिक पारशी सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी जाऊन सोमवारी (दि. ५ जानेवारी २०२६) गावात परतली. यानंतर मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी गावात सकाळपासून धार्मिक विधी व पूजाअर्चा मोठ्या भक्तिभावात पार पडली.
सकाळी देवीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सुमारास पारंपरिक ‘पडल्या भरण्याचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, रेणुका देवी भक्त महिला भगिनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
पडल्या भरण्याच्या विधीनंतर पारशी यात्रेची औपचारिक सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात व शांततेत पार पडला. तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या या पारशी यात्रेला गावात विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असून, भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो.

