बेळगाव : के.एल.ई. सोसायटीच्या बी. व्ही. बेल्लद लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. १४ आणि १५ ऑक्टोबर २०२५ रोजी बेंगळुरू येथील बिशप कॉटन लॉ कॉलेजतर्फे, ಕರ್ನಾಟಕ राज्य कायदा विद्यापीठ हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन योग स्पर्धेत या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेत कॉलेजच्या टीमचे नेतृत्व गिरिराज हिरेमठ यांनी केले. त्यांच्या सोबत प्रज्वल यल्लप्पा कोल्कर, सुप्रित संकैत लोंडे आणि अभिषेक शेड्युरे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वांनी उत्कृष्ट समन्वय आणि शिस्तीच्या बळावर ही उल्लेखनीय कामगिरी केली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल के.एल.ई. सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, प्राचार्य तसेच अध्यापकवर्ग आणि विद्यार्थीवर्ग यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

