आशा पत्रावळी यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार
प्राईम टायकून मीडिया आयोजित महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार २०२६ हा पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान उद्योजक व व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात बेळगावच्या आशा पत्रावळी यांच्या विणकामातील योगदानाबद्दल वुमन इंटरप्रीन्यूयर इन हॅन्डमेड अँड क्राफ्ट इंडस्ट्री या श्रेणीत महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार आशा पत्रावळी यांनी स्वीकारला.
लोकरीचे विणकाम, स्वेटरमधील डिझाईन आणि लेखन क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
हस्तनिर्मित निटवेअर, स्वेटर डिझाइन व सर्जनशील लेखन क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य, गुणवत्ता, सातत्य आणि महिला उद्योजक म्हणून केलेली प्रेरणादायी वाटचाल याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन निलेश साबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी आरती गंडलेवार, प्रथम पटेल तसेच आदित्य मेश्राम हे उपस्थित होते.

