बेळगांव:मराठा लाईट इन्फत्री रेजिमेंटल सेंटर येथे दि. ४ फेब्रुवारी रोजी मराठा दिवस साजरा करण्यात आला. ४ फेब्रुवारी १६७० रोजी तानाजी मालुसरेनी सिंहगड किल्ला जिंकला होता. मराठा सैन्याने मिळवलेल्या दैदीप्यमान विजयाच्या स्मरणार्थ मराठा लाईट इन्फत्री रेजिमेंटल सेंटर येथे मराठा दिवस साजरा केला जातो. मराठा दिवस कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जनरल राकेश मनोचा उपस्थित होते. मेजर जनरल राकेश मनोचा यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम कोल्हापूरच्या कलाकारांनी सादर केला.तरुण आणि तरुणीनी सादर केलेली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके देखील उपस्थितांचे आकर्षण ठरली.मराठा दिवस कार्यक्रमाला लष्कराचे अधिकारी, जवान, त्यांचे कुटुंबीय, सेवानिवृत्त अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते.

