Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Education News

Maratha Mandal Polytechnicच्या विद्यार्थ्यांची नवकल्पनांना भरारी!

‘EUREKA! – Road to Enterprise 2026’मध्ये श्रध्दा देसाईंना तृतीय क्रमांक

बेळगाव : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्याच्या उद्देशाने नाविन्यपूर्ण संकल्पना मांडत Maratha Mandal Polytechnicच्या अंतिम वर्षातील E&C शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘EUREKA! – Road to Enterprise 2026’ या पिचिंग स्पर्धेत आपल्या कल्पकतेची छाप पाडली. MMEC, बेळगाव येथे आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक आणि व्यावहारिक समस्यांवर आधारित अभिनव प्रकल्प सादर केले.news_1787666174_0_934.webp

 


या स्पर्धेत श्रध्दा देसाई हिने सादर केलेल्या ‘RainGuard – Smart Rainwater Monitoring & Management System’ या संकल्पनेला तृतीय क्रमांक मिळाला. ‘Save Water… Every Drop Counts’ या संदेशावर आधारित या प्रकल्पासाठी तिला रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांशी संबंधित कल्पना स्पर्धेत मांडल्या. श्रावणी सोनटक्की आणि प्रणाली नंदीहळ्ळी यांनी ‘Bridge That Feels Its Own Damage’, तर सुदर्शन अमटूर आणि दत्तात्रय मराचे यांनी ‘Med Sure – Smart Medication Reminder’ ही संकल्पना सादर केली.
तनुश्री यल्लूरकर हिने ‘SmartQ – Smart Queue Management System’, तर अमृता उपरी आणि मानाली चौधरी यांनी ‘Aqua AI – Smart Water Saving Data Center’ या संकल्पनेद्वारे पाणी व्यवस्थापन आणि बचतीचा विषय मांडला.
प्रभू बागेवाडी आणि हर्ष कामकर यांनी ‘Smart Machine Health Passport’, तर नूतन कुडचीकर हिने आपत्कालीन परिस्थितीत फोन न करता मदतीचा संकेत देणाऱ्या ‘Silent Shield’ या अभिनव संकल्पनेचे सादरीकरण केले.
या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना केवळ आपले तांत्रिक ज्ञान सादर करण्याची संधी मिळाली नाही, तर प्रत्यक्ष जीवनातील समस्या ओळखून त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्याचा अनुभवही मिळाला. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपल्या कल्पना मांडत सर्जनशील विचार, समस्या सोडविण्याची क्षमता आणि उद्योजकीय दृष्टिकोनाचे दर्शन घडविले.
श्रध्दा देसाईच्या तृतीय क्रमांकाच्या यशाबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. तिच्या RainGuard या संकल्पनेने पाणी संवर्धनासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाहण्याचा अभिनव दृष्टिकोन मांडला.
या यशाबद्दल प्राचार्य श्री. आर. एस. सूर्यवंशी, Innovative Council Coordinator सौ. गौरी उप्पिन, E&C विभागप्रमुख श्री. एम. एन. जावळकर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचा गौरव केला.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे Maratha Mandal Polytechnicच्या नवोन्मेषी आणि कौशल्याधारित शिक्षणाला नवी ओळख मिळाली असून, तांत्रिक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, कल्पकता आणि उद्योजकतेची भावना विकसित होत असल्याचे या स्पर्धेतून अधोरेखित झाले आहे.

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*