LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मराठी विद्यानिकेतनमध्ये मराठी भाषा दिन साजरा*

Advertisement
मराठी विद्यानिकेतनमध्ये मराठी भाषा दिन साजरा

मराठी विद्यानिकेतनमध्ये 27फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेतील शिक्षक प्रसाद सावंत यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांच्या संगीत मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी 'उषःकाल होता होता'हे गाणे सादर केले. मराठी विभागातर्फे 'शब्दोद्यान'या हस्तलिखिताचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेची सद्य परिस्थिती याबद्दल‌ आपल्या मनोगतात प्रसाद सावंत यांनी व्यक्त केले. शाळेतील मराठी विषय शिक्षक बी.एम्.पाटील, माया पाटील, दीप्ती कुलकर्णी, जयश्री पाटील, कमल हलगेकर, शामला चलवेटकर, नम्रता पाटील, शैला पाटील, मुक्ता आलगोंडी, स्नेहल पोटे, शाहीन शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

इयत्ता पाचवी 'ब' च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका मंजुषा पाटील यांच्या मार्गदर्शनाने भित्तीपत्रके बनविली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार ,सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षकवृंद,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका दीप्ती कुलकर्णी यांनी केले.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*