LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी रायगडावरून*

Advertisement
*मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी रायगडावरून*

मराठा मंदिर येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत सुरुवातीला 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले त्याच बरोबर इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.

त्या नंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या व प्रत्येक मराठी माणूस ज्याला स्वराज्याची राजधानी मानतो त्या किल्ले रायगडावरून 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनी सुरू होणार आहे.

26 जानेवारी हा स्वतंत्र भारताचा लोकशाही दिवस मानला जातो व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेचा संविधान दिवस मानला जातो. याच संविधानाची सीमाभागात कर्नाटक सरकारने पायमल्ली गेली 70 वर्षे सुरू केलेली असून त्याची परिसीमा गाठलेली आहे.

युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंदिर बेळगाव येथे झालेल्या दिनांक 12 जानेवारीच्या बैठकीत मराठी सन्मान यात्रेच्या नियोजना संदर्भात बैठक पार पडली. ज्या कोणी कार्यकर्त्यांना या सन्मान यात्रेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी 20 जानेवारी 2026 पर्यंत नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

कार्याध्यक्ष धनंजय पाटील (7899094108)

सरचिटणीस मनोहर हुंदरे (9945346640)

उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर

(9741289806)

या बैठकीला अध्यक्ष शुभम शेळके,कार्याध्यक्ष धनंजय पाटील,सरचिटणीस मनोहर हुंदरे,उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर,अशोक घगवे,मोतेश बारदेशकर,सागर सांगावकर अभिजीत मजुकर, इंद्रजीत धामणेकर,सुधीर शिरोळे, रमेश माळवी,सुरज जाधव, राजू पाटील, अभिषेक कारेकर, प्रवीण नावगेकर, रिचर्ड अंथोनी, आदी उपस्थित होते.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*