कर्नाटक लॉ सोसायटीच्या जी आय टी कॉलेजच्या नॅशनल फेस्ट ऑराच्या सांगता समारंभात प्रख्यात पार्श्वगायक मोहित चौहानने आपल्या सुराने उपस्थिताना मोहित केले. जी आय टी कॉलेजच्या मैदानावर जमलेली तरुणाई मोहितच्या सुरावर थिरकली आणि उपस्थित सुरांच्या वर्षावात चिंब झाले.जब वुई मेट या चित्रपटातील जो भी मै या गीताने केली.त्यानंतर ये दुरिया ये राहो की दुरिया गीत सादर केले.
मोहितने आपल्या गीतावर उपस्थिताना ठेका धरायला लावला. काही गीते सादर करताना मोहितने उपस्थिताना देखील गायला लावले.ब्लास्ट फ्रॉम द पास्ट अशी जुन्या चित्रपटातील गाण्यांचे मुखडे गाऊन उपस्थिताना एक वेगळाच आनंद मिळवून दिला. उत्कृष्ट वाद्यवृंद, लाजवाब साउंड सिस्टीम आणि रंगमंचारील नेत्रदिपक विद्युत रोशणाई यामुळे एक वेगळे वातावरण मैफिलीच्या ठिकाणी निर्माण झाले होते. बेळगावची ही आपली पहिलीच भेट आहे. निसर्गसुंदर असे गाव आहे असे मोहित चौहान समारोप करताना म्हणाला.

