LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कल्लेहोळ शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात*

Advertisement
बेळगाव : तालुक्यातील कल्लेहोळ येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शासन निर्देशानुसार वैज्ञानिक प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.

यावेळी भारतरत्न वैज्ञानिक C. V. Raman यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. व्ही. पाटील यांनी विज्ञान दिनाचे औचित्य स्पष्ट करत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले. विज्ञान दिन साजरा करण्यामागील उद्देश आणि त्याचे सामाजिक महत्त्व त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून मांडले.

शाळेच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती पी. बी. कागणकर यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात विज्ञानाची उपयुक्तता समजावून सांगितली. विज्ञान केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थिनींनी सादर केलेले विविध वैज्ञानिक प्रयोग. सोप्या आणि प्रभावी पद्धतीने केलेल्या प्रयोगांमधून विज्ञानाचे तत्त्व समजावून देत त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली.

https://youtube.com/shorts/V3CjzErdNkw?si=rXK50iBHFdorLILz

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जीपीटी श्री. एम. एन. भुट्टेवाडकर यांनी केले. या उपक्रमाला शाळेतील शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी रुजविण्याचा आणि नवोपक्रमांना चालना देण्याचा संदेश देण्यात आला.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*