बेळगाव : चिकाटी, मेहनत आणि ध्येयनिष्ठा यांच्या जोरावर नेहा दिनकर आळतेकर यांनी भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्था (ICAI) आयोजित अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत प्रतिष्ठेची चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही पदवी संपादन केली आहे.
नेहाच्या या यशामुळे आळतेकर कुटुंबासोबतच परिसरातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घकाळ परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या बळावर मिळवलेले हे यश सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
नेहा यांच्या या यशामागे पालकांचे प्रोत्साहन, तसेच शिक्षणातील समर्पण आणि चिकाटी यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून, संपूर्ण बेळगावकरांनी अभिमान व्यक्त केला आहे.
तिचे वडील दिनकर रामचंद्र आळतेकर हे येंकेस इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एचओडी अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत तसेच आई कवयित्री अस्मिता दिनकर आळतेकर यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे सीए विनय कुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

