कर्नाटकात मुख्यमंत्री बदल होणार काय याची चर्चा सुरु असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवराज अरस यांनी आपल्या दोन वेळच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी २७९४ दिवस मुख्यमंत्रीपद भूषवले होते. आज सिद्धरामय्या यांनी २७९४ दिवस पूर्ण करून नवा राजकीय विक्रम केला आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निमित्ताने बेळगावात मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात पाच वर्षे चार दिवस पूर्ण केले होते. त्यानंतर दुसऱ्या कार्यकाळात सिद्धरामय्या यांनी सहा जानेवारी रोजी एकूण २७९४ दिवस पूर्ण केले आहेत. यामुळे मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजकीयदृष्ट्या इतिहास घडवला आहे. या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेळगावात जल्लोष साजरा केला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करून एकमेकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी सिद्धरामय्या यांच्या नावाने घोषणा देऊन आनंद व्यक्त केला.

