बेळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शहर शाखेची कार्यकर्त्यांची बैठक येत्या रविवार, दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता घेण्यात येणार आहे. ही बैठक रंगुबाई भोसले पॅलेस, रामलिंग खिंड गल्ली, बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत ‘एक नोव्हेंबर काळा दिन’ आणि ‘सायकल फेरी’ या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काळा दिन मोठ्या प्रमाणात पाळण्यासाठी आणि सायकल फेरीच्या नियोजनासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवली जाण्याची शक्यता आहे.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या नियोजनात सक्रिय सहभाग घ्यावा.
महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी लढा देताना ‘काळा दिन’ हा प्रतिकाराचा आणि मराठी ओळखीचा प्रतीक म्हणून दरवर्षी पाळला जातो. यंदा सुद्धा उत्साह, शिस्त आणि एकात्मतेने हा दिवस साजरा करण्याची तयारी सुरू आहे.

