बेळगाव (प्रतिनिधी): बेळगावातील प्रगत विचारांचे युवा उद्योगपती आणि शेतकरी हिताचे भान असलेले उद्योजक मल्लिकार्जुन जगजंपी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (Jagjampi Industries Group) यांनी आपल्या सहकाऱ्यांसह २४व्या ऊस परिषदेत सहभागी होत शेतकरी सन्मानाचा भाव व्यक्त केला.
या प्रसंगी त्यांच्या सोबत जगजंपी ऍग्रोचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक महेश शेट्टी, तसेच जगजंपी ऑटो एग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पोवार हे उपस्थित होते.
या तिघांनी एकत्रितपणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि नेते श्री. राजू शेट्टी यांचा पुष्पहार घालून सन्मानपूर्वक सत्कार केला.
या कार्यक्रमात शेतकरी, उद्योगक्षेत्रातील मान्यवर आणि ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगजंपी उद्योग समूहाने शेतीशी निगडित तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केलेल्या कामांचेही उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमादरम्यान ऊस उत्पादकांच्या हितासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनखर्च नियंत्रण आणि बाजारभाव स्थैर्य या विषयांवरही चर्चा झाली.

