LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*भूतनाथ डोंगर परिसरात पोलिसांची मोहीम |*

Advertisement
खानापूर : खानापूर–बेळगाव महामार्गालगत असलेल्या गणेबैलजवळील भूतनाथ डोंगर परिसरात वाढत्या पर्यटन आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवरून रविवारी खानापूर पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवली. विशेषतः सायंकाळनंतर युवक–युवती रात्री उशिरापर्यंत थांबून केलेल्या विहारामुळे धार्मिक परिसरातील शिस्त बिघडणे आणि स्थानिकांना होणारा त्रास याबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या होत्या.

साप्ताहिक सुट्ट्यांमध्ये भूतनाथ देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. त्यात युवक–युवतींची संख्या अधिक असून वाहने, ध्वनी व गोंधळामुळे रात्रीपर्यंत हलकल्लोळ निर्माण होत असल्याने परिसराच्या शांततेवर परिणाम होत होता.

रविवार, दि. 23 रोजी पर्यटकांची असामान्य गर्दी पाहता काही युवक–युवती डोंगरावर उशिरापर्यंत थांबल्याची माहिती 100/112 आपत्कालीन सेवेला प्राप्त झाली. त्यानंतर खानापूर पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीची पाहणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक लालसाब गोवंडी यांनी स्वतः मोहीमेचे नेतृत्व केले.

तपासणी दरम्यान पोलिसांनी युवक–युवतींना —
🔹 धार्मिक स्थळात शिस्त राखणे
🔹 सायंकाळीन पर्यटनासाठी वेळेचे भान ठेवणे
🔹 सुरक्षेचे व वाहतूक नियमांचे पालन करणे

— याबाबत समज दिली व आवश्यक त्या ठिकाणी कान उघाडणी केली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात —
▪️ हेल्मेट नसणे
▪️ परवाना नसणे
▪️ वाहन कागदपत्रे अपूर्ण
▪️ स्टंट व विनाकारण गोंधळ

— अशा प्रकरणांमध्ये खानापूर पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी स्पष्ट केले की, पर्यटकांची सुरक्षितता, धार्मिक परिसराचा सन्मान आणि स्थानिकांच्या शांततेसाठी अशा तपासणी मोहिमा पुढेही नियमित सुरू राहतील.

या मोहीमेबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या तत्पर कृतीचे कौतुक केले आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*